पीएम्इंडिया

बेटी बचाओ, बेटी पढाओ: मुलींची काळजी

“बेटा बेटी, एक समान”: हा आपला मंत्र असला पाहिजे. “आपण मुलीच्या जन्माचे स्वागत करुया आणि मुलीचा जन्म झाल्याचे स्वागत करताना 5 झाडे लावा असे आवाहन मी तुम्हाला करतो” ….
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांनी दत्तक घेतलेल्या जयापूर गावातील वक्तव्य.

“बेटी बचाओ, बेटी पढाओ” हया उपक्रमाची हरियाणतल्या पानिपत इथे 22 जानेवारी 2015 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ झाला. या उपक्रमात बाल सिंग गुणोत्तरात(CSR)होणाऱ्‍या घसरणीवर तसेच महिला सक्षमीकरण संदर्भातल्या मुद्दयांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. महिला आणि बाल कल्याण्य, आरोग्य-कुटुंब कल्याण तसच मनुष्यबळ विकास या तीन मंत्रालयाचा हा संयुक्त उपक्रम आहे.

पीसी आणि पीएनटीडी कायद्यांची अंमलबजावणी देशभर जागृती आणि सल्ला मोहीम राबवणे तसंच बाल लिंग गुणोत्तराचं प्रमाण कमी असणाऱ्‍या 100 जिल्हयात बहु-विभागीय उपाययोजना करणे यांचा पहिल्या टप्प्‍यात समावेश आहे. प्रशिक्षण, जनजागृती मध्ये वाढ करणे तसच सामुहिक एकत्रीकरण याद्वारे मानसिकतेत बदल करण्यावर सर्वात जास्त भर देण्यात आला आहे.

समाजाच्या मुलींकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात मोठा बदल घडवून आणण्याचा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. बिबिपूर इथल्या सरपंचाने हाती घेतलेल्या“सेल्फी विथ डॉटर”या उपक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या“मन की बात”मध्ये कौतुक केले होते. लोकांनी आपल्या मुलींबरोबरची“सेल्‍फी”सर्वांसमोर मांडावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आणि लवकरच हया आवाहनाला जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. भारतातील आणि जगभरातील लोकांनी, त्यांच्या मुलीसोबतच्या“सेल्फी”सर्वांसमोर मांडल्या आणि मुली असणाऱ्‍यांसाठी हा एक अभिमानाचा क्षण ठरला.

0.13648200-1451573004-empowering-girl-child

“बेटी बचाओ, बेटी पढाओ”मोहीम सुरु झाल्यानंतर, जवळजवळ सर्व राज्यांमध्ये बहु विभागीय जिल्हा कृती योजनेचा प्रारंभ झाला. जिल्हा स्तरावरील अधिकारी आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांची क्षमता वाढवण्यासाठी प्रशिक्षकांना क्षमता निर्मिती कार्यक्रम आणि प्रशिक्षण देण्यात आले. एप्रिल-ऑक्टोबर 2015 पासून महिला आणि बाल विकास मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात असे 9 प्रशिक्षण संच आयोजित केले आहेत.

स्थानिक पातळीवरील उपक्रम

0.00072000-1451573123-betibachao-2

“बेटी बचाओ, बेटी पढाओ”योजनेअंतर्गत पिथोरागड जिल्हयाने मुलींच्या संरक्षणासाठी आणि तिला शिक्षण मिळावे यासाठी अनेक पाऊले उचलली आहेत. या साठी जिल्हा आणि तालुका पातळीवर कृती दल तयार करण्यात आली आहेत. तसचCSRसंदर्भात बैठक घेऊन कृती योजना तयार करण्यात आली आहे. मोठया समुदायाला या योजनेची अधिकाधिक माहिती मिळाली म्हणून जागृती निर्मिती कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. विविध शाळा, सैनिकी शाळा, सरकारी विभागातील कर्मचारी यांचा समावेश असणाऱ्‍या अनेक रॅली काढण्यात आल्या आहेत.

या उपक्रमाविषयी जागरुकता वाढावी, यासाठी पिथोरागड मध्ये पथ नाटयांचही आयोजन करण्यात येते. दर्शकांमध्ये मोठया प्रमाणावर जागरुकता निर्माण व्हावी म्हणून केवळ गावांमध्येच नाही तर बाजाराच्या ठिकाणीही ही पथनाटये आयोजित करण्यात येतात. कथांमधून गोष्टी समोर आल्याने स्त्री भृण हत्येबाबतच्या प्रश्नाबाबत लोक अधिक संवेदनशील होत आहेत. मुली आणि तिला आयुष्यात सामोऱ्‍या जाव्या लागणाऱ्‍या समस्यायांचे प्रत्ययकारी दर्शन या पथनाटयातून घडते. सहयांची मोहीम, शपथ घेण्याचा समारंभ याद्वारे 700 महाविद्यालयीन विद्यार्थी आणि अनेक लष्करी कर्मचा-यांपर्यंत हा उपक्रम पोहोचला आहे.

पंजाबमधल्या मनसा जिल्हयात मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.“उडान-सपनिया दी दुनिया दी रुबरु”या योजनेअंतर्गत, मनसा प्रशासनाने सहावी ते बारावी वर्गातील मुलींकडून प्रस्ताव मागवले आहेत. या अंतर्गत डॉक्टर, पोलीस अधिकारी, अभियंता, भारतीय प्रशासन सवेवेतील अधिकारी बनण्याची महत्वाकांक्षा असलेल्या मुलींना या क्षेत्रातील व्यायसायिकांबरोबर एक दिवस घालवण्याची संधी मिळणार आहे.

या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला आणि 70 हून अधिक विद्यार्थिनींना अश्या व्यावसायिकांबरोबर एक दिवस घालवून ते कसे कार्य करतात ते पाहण्याची संधी मिळाली आणि भावी व्यवसाय निवडीबाबत निर्णय घेण्यात हया संधीची मदत झाली.

लोड होत आहे...