पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आई.सी. एस.आईच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या उदघाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संस्था सचिवांना संबोधन

आई.सी. एस.आईच्या  सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या उदघाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संस्था सचिवांना संबोधन

आई.सी. एस.आईच्या  सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या उदघाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संस्था सचिवांना संबोधन

आई.सी. एस.आईच्या  सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या उदघाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संस्था सचिवांना संबोधन

भारतीय कंपनी सचिव संस्था अर्थात आई.सी. एस.आईच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या उदघाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संस्था सचिवांना संबोधित केले. पंतप्रधानांनी आईसीएसआईशी निगडित सर्व मान्यवरांचे अभिनंदन केले.

या प्रसंगी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की,अशा सर्व सचिवांमध्ये मी उपस्थित आहे जे कंपनीला नियमांचे पालन करण्यास योग्य मार्गदर्शन आणि कंपनीचे लेखे उत्तम रित्या ठेवण्याची जबाबदारी सांभाळतात. त्यांच्या या कामामुळे देशाची कार्पोरेट संस्कृती स्थापन होण्यास मदत होते.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, देशात असे काही लोक आहेत जे सामाजिक व्यवस्था दुबळी बनविण्याचा आणि राष्ट्राच्या प्रतिष्ठेला खाली दाखवण्याचा प्रयत्न करतात. सरकार सध्या अशा प्रकारच्या घटकांना शोधून प्रशासन स्वच्छ ठेवण्याचे काम करीत आहे.

सरकारच्या अर्थव्यवस्थेला सुदृढ ठेवण्याच्या प्रयत्नांबाबत बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, सध्या अर्थव्यवस्थेला कमी रोखीसह काम करावे लागत असून जीडीपीचा रोखी बरोबरीचा दर विमुद्रिकरणाच्या पूर्वी १२% वरून ९% पर्यंत आला होता. पंतप्रधानांनी यावेळी अशा लोकांपासून सावध राहायला सांगितले जे वाईट गोष्टी समाजात सर्वत्र पसरवितात. पंतप्रधानांनी यावेळी भूतकाळातील अशा गोष्टींचा उल्लेख केला जेंव्हा वृद्धी दर ५.७% पर्यंत खाली आला होता. मागील तिमाही हि याची साक्ष आहे. असेही ते म्हणाले .

पंतप्रधान पुढे म्हणाले की, असे प्रसंग ज्यावेळी कमी वृद्धी दर, हा चलनवाढीतील वृद्धी, उच्च चालू लेखा तूट आणि वर्तमान तूट यांच्या बरोबरीने चालत होता . पंतप्रधानांनी सांगितले कि, अशी एक वेळ होती जेंव्हा भारताची गणना अशा पाच देशांमध्ये व्हायची जे मंदीशी झुंझत होते आणि जागतिक पुर्नवसुली होण्यासाठी धडपडत होते.

मागील तिमाहीतील घसरलेल्या वृद्धी दरा बाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, त्यांचे सरकार वृद्धी दर पूर्वपदावर आणण्यास कटिबद्ध असून , यासंदर्भात, संबंधित सुधारणा करण्याबाबतीतील निर्णय घेण्यात आले आहे. हि प्रक्रिया निरंतर राहील. येत्या काही वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेने एक नवा उचांक गाठलेला असेल असे ही पंतप्रधानांनी सांगितले तसेच देशाची आर्थिक स्थिरता राखण्याचे आश्वासनहि त्यांनी यावेळी दिले. पंतप्रधान म्हणाले की, आदराची जागा प्रयत्नांनी मिळवता येते आणि प्रयत्नांची आवड हि संरक्षित राहील.

पंतप्रधानांनी काही महत्वाच्या क्षेत्रातील मागील तीन वर्षातील गुंतवणूक आणि आराखड्यातील वृद्धीबाबत माहिती दिली. ते म्हणाले कि, २१ अति महत्वाच्या क्षेत्रात ८७ सुधारणा या कालावधीमध्ये घडविण्यात आल्या आहेत. त्यांनी यावेळी गुंतवणुकीतील घेतलेल्या भरारी संदर्भातील संदर्भातील सांख्यिकी प्रस्तुत केली.

सरकारच्या धोरण आणि नियोजनात प्रत्येक वेळी मध्यम आणि गरीब वर्गातील लोकांचे हित जपण्याची काळजी घेण्यात येते. ज्याचा परिणाम त्यांचे राहणीमान सुधारण्यास होतो. असेही पंतप्रधानांनी सांगितले. “कितीही टीकेला तोंड द्यावे लागले तरी मी राष्ट्र आणि देशाच्या जनतेला प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करत राहील तसेच स्वतः च्या सुखासाठी देशाचे हित गहाण ठेऊ शकत नाही” असे आश्वासनही त्यांनी यावेळी जनतेला दिले.

******

बी. गोखले