पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उपराष्ट्रपती एम  व्यंकय्या नायडू यांचे राज्यसभेत स्वागत करताना पंतप्रधानांचे भाषण

आदरणीय सभापतीराज्यसभा सदनातर्फे तसेचदेशवासियांकडून आपले खूप खूप अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा.      

 11 ऑगस्टदेशाच्या इतिहासातल्या   महत्वाच्या तारखेशी जोडली गेलेली तारीख आहे. आजच्याच दिवशी 18 वर्षाच्या कोवळ्या वयात खुदिराम बोस यांना फासावर चढवण्यात आले.स्वातंत्र्यासाठी कसा संघर्ष झालाकिती जणांनी बलिदान दिले आणि या सर्व घटना पाहता आपणा सर्वांची जबाबदारी किती मोठी आहे याचे स्मरणही घटना करून देते.

 आदरणीय व्यंकय्या नायडू हे देशाचे असे पहिले उपराष्ट्रपती आहेत ज्यांचा जन्म स्वतंत्र भारतात झाला आहेही बाब आपणा सर्वांच्या ध्यानात नक्कीच आली असेल.

 आदरणीय व्यंकय्या नायडू असे पहिले उपराष्ट्रपती आहेतमला वाटते कदाचित ते एकटे उपराष्ट्रपती आहेत जे अनेक वर्षे याच परिसरातयाच वातावरणात वाढले आहेतकदाचित देशाला असे पहिले उपराष्ट्रपती लाभले आहेत जे या सदनाच्या प्रत्येक बाबीशी परिचित आहेत. सदस्यापासून समितीपर्यंत,समिती ते सदनाच्या कार्यवाही पर्यंत स्वतः या प्रक्रियेतून गेलेले पहिले उप राष्ट्रपती देशाला प्राप्त झाले आहेत.

 ते सार्वजनिक जीवनात जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून आले. जयप्रकाश नारायण यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत,सुशासनासाठी जे राष्ट्रव्यापी आंदोलन झालेत्यात   विद्यार्थीदशेत,आन्धप्रदेश मधून एक विद्यार्थी नेता म्हणून त्यांनी स्वतःला झोकून दिले. तेव्हापासून विधानसभा असोराज्यसभा असोत्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचाही विकास केला आणि कार्यक्षेत्राचाही विस्तार केला.त्यामुळेच आज आपण सर्वानी त्यांची निवड करून या पदासाठी गौरवपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे सुपूर्द केली.

   व्यंकय्याजी शेतकऱ्याचे पुत्र आहेत.त्यांच्यासमवेत अनेक वर्षे काम करण्याचे सौभाग्य मला लाभले.गाव असो,  गरीब असोशेतकरी असोया विषयांवर बारकाईने अभ्यास करत प्रत्येक वेळी ते आपल्याकडची  माहिती देत राहिले.केंद्रीय मंत्रिमंडळातही ते नागरी विकास मंत्री होते. मात्र मला नेहमी वाटत असे की मंत्रिमंडळात चर्चेदरम्यान ते शहर या विषयावर बोलत असत त्यापेक्षा जास्त रुचीने  ते ग्रामीण आणि शेतकरी या विषयावर चर्चा करत असत. हा विषय त्यांना  मनापासून जवळचा होता,लहानपणापासूनची कौटुंबिक पार्श्वभूमी त्याला कारणीभूत असावी.

 व्यंकय्याजी उपराष्ट्रपतीपदावर विराजमान झालेत्याचे औचित्य साधून साऱ्या जगाला एका गोष्टीची माहिती करून द्यायला हवीमला असे वाटते की आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे. भारताची लोकशाही किती प्रगल्भ आहे याची माहिती देण्याची आपली  जबाबदारी आहे .भारताच्या संविधानाची किती मोठी ताकद आहे. आपल्या ज्या थोर पुरुषांनी संविधान दिले, त्या संविधानाचे सामर्थ्य असे आहे की हिंदुस्तानच्या संविधानिक पदावर असे लोक विराजमान आहेतज्यांची पार्श्वभूमी गरिबीची आहे,गावातून आले आहेतसर्वसामान्य कुटुंबातून आले आहेत,ज्यांची पिढीजात श्रीमंती नाही. देशाच्या सर्व संविधानिक पदावर या पार्श्वभूमीतल्या व्यक्ती असणेभारताच्या लोकशाहीच्या प्रगल्भतेचे दर्शन घडवते आणि हिंदुस्तानच्या सव्वाशे कोटी देशवासियांना याचा अभिमान आहे. संविधानाच्या निर्मात्यांना मी पुन्हा एकदा नमन करतो.

 व्यंकय्याजी यांच्याकडे व्यक्तित्व,कृतित्व आणि वक्तृत्वही आहे.ते भाषण करतात तेव्हा कधीकधी वाटते,जेव्हा तेलगूमधून करतात तेव्हा वाटते वेगाने गाडी चालली आहे.मात्र हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा विचारात स्पष्टता आहे,प्रेक्षकांशी एकरूपता आहे. हा शब्दांचा खेळ नाही,वक्तृत्वाच्या जगात वावरणाऱ्या लोकांना हे माहित आहे की केवळ शब्दांचे खेळ केले तर त्या भावना कोणाच्या मनापर्यंत पोहोचत नाहीत.मात्र विचारधारेवर ठाम विश्वासाने आपला दृष्टिकोन आणि दृढनिश्चयाने जेव्हा शब्द येतात तेव्हा ते आपोआपच जनतेच्या मनाला स्पर्शून जातात.व्यंकय्याजी यांच्याबाबतीत असे घडले आहेदिसले आहे.

 हे सत्य आहे के ग्रामीण विकासात असे कोणतेच खासदार नाहीत जे सरकारकडे या विषयाबाबत आग्रह धरत नाहीत. सरकार कोणाचेही असू देडॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालचे   सरकार असू देकिंवा माझ्या नेतृत्वाखालचे सरकार असू देखासदारांची एक मागणी सातत्याने असते आणि ती आपल्या क्षेत्रात प्रधान मंत्री ग्राम सडक कार्यासाठी. आपल्या सर्व संसद सदस्यांसाठी अभिमानाची बाब आहे की देशाला प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची कल्पनात्याची योजना याची भेट कोणी दिली असेल तर ती आपल्या उपराष्ट्रपतींनी दिलीआदरणीय व्यंकय्याजी यांनी दिली. अशा गोष्टी तेव्हाच घडत जेव्हा गावाप्रतीशेतकऱ्यांप्रतीदलितांप्रतीपीडितशोषितांप्रती आपुलकी असते,त्यांना कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्याचा संकल्प असतो.

 आज उपराष्ट्रपती या नात्याने व्यंकय्याजी आपल्यासोबत आहेतया सदनातआपल्या सगळ्यांना काही क्षणासाठी जरा अवघड वाटेलकारण वकिलांमध्येबारमधील एखादा वकील न्यायाधीश झाला तर सुरवातीलान्यायालयात त्यांच्या समवेत बार सदस्य संवाद साधतात तेव्हा  सुरवातीला एक अवघडलेपण येतेअरे कालपर्यंत तर ही व्यक्ती माझ्यासोबत उभी होतीमाझ्याबरोबर वाद-विवाद करत होती,आज मी आता कसा संवाद साधावात्याचप्रमाणे काही क्षणासाठी आम्हा सर्वांनाच, विशेषकरून या सदनाच्या सदस्यांना,ज्यांनी इतकी वर्षे त्यांच्यासमवेत मित्र या नात्याने काम केले आणि आज ते या पदावर विराजमान आहेत. आपल्या लोकशाहीचे हे वैशिष्ट्य आहे की व्यवस्थेनुसारत्याला अनुकूल अशी  आपण आपली कार्यशैलीही बनवतो.

 मला पूर्ण विश्वास आहे की आपल्यात दीर्घ काळासाठी राज्यसभा सदस्य म्हणून काम करूनसर्व खाचा-खोचा जाणूनपरिपक्व झालेली व्यक्ती उपराष्ट्रपती आणि या सभागृहाचे सभापती म्हणून आपल्याला मार्गदर्शन करतीलदिशा देतील तेव्हा या पदाची प्रतिष्ठा अधिक वाढवण्यात त्यांचे मोठे योगदान राहील.मला पूर्ण विश्वास आहेएका मोठ्या बदलाचे संकेत मला दिसत  आहेत. ते चांगल्यासाठीच असतील.व्यंकय्याजी या प्रतिष्ठेच्या पदावर विराजमान झाले आहेत तेव्हा मी या बाबीचे स्मरण करू इच्छितो,

 ‘अमल  करो ऐसा  अमन मैं

 अमल  करो ऐसा  अमन मैं 

 जहाँ से गुजरी तुम्हारी नजरे

 उधार सें तुम्हे सलाम आए  

 त्याच धर्तीवर  मी म्हणेन

 अमल  करो ऐसा  सदन मैं 

 जहाँ से गुजरी तुम्हारी नजरे

 उधार सें तुम्हे सलाम आए  

 खूप-खूप शुभेच्छा. अनेक अनेक धन्यवाद.

  

B.Gokhale/N.Chitale/Anagha