पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

‘टीआयटीपी’ कार्यक्रमाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये भारत आणि जपान यांच्यामध्ये लवकरच होणा-या टीआयटीपी म्हणजेच ‘टेक्निकल इंटर्न ट्रेनिंग प्रोग्रॅम’ या सामंजस्य कराराला मान्यता देण्यात आली.

हा सामंजस्य करार भारत आणि जपान यांच्या दरम्यान लवकरच करण्यात येणार आहे. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री येत्या 16 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत टोकियोला भेट देणार आहेत. त्यावेळी उभय देशात या करारावर स्वाक्षरी करण्यात येणार आहे. या करारानुसार भारतीय तंत्रज्ञांना प्रशिक्षणासाठी तीन ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी जपानला पाठवण्यात येणार आहे. कौशल्य विकसनासाठी या कराराचा लाभ घेता येणार आहे.

N.Sapre/S.Bedekar/Anagha