पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नर्मदेच्या बांधाऱ्याची कोनशिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठेवण्यात आली, त्या प्रसंगी सार्वजनिक सभेला पंतप्रधान मोदी यांनी केलेले संबोधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नर्मदा नदीच्या ‘भडभूट’ बांधार्याची कोनशिला ठेऊन उदघाटन केले. सार्वजनिक सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी, उदना (सूरत, गुजरात) आणि जयनगर (बिहार) दरम्यान अंत्योदय एक्स्प्रेस ला हिरवी झेंडी दाखवून या एक्सप्रेसची ही सुरवात केली. तसेच गुजरात नर्मदा फर्टिलायझर कार्पोरेशन लि. च्या विविध प्रकल्पांचे उदघाटन हि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

जनतेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, अंत्योदय एक्स्प्रेस हा एक प्रशंसनीय उपक्रम आहे जो विशेषत: उत्तर प्रदेश किंवा बिहारमधील लोकांशी जोडला जातो आणि जे घरापासून दूर राहून काम करतात. त्यांना उत्तर प्रदेश आणि बिहार दरम्यान धावणाऱ्या या एक्सप्रेस मुळे छट पूजेसाठी घरी जाणे सोपे होणार आहे

मोदी पुढे म्हणाले की, पशुपालन व्यवसायातील गुजरातच्या प्रगतीमुळे शेतकऱ्यांना मदत झाली असून, त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पशू आरोग्य मेळाच्या अभ्यासासाठी गुजरातला अभ्यास चमू पाठविण्याबाबत विचारले होते. ते म्हणाले की, वाराणसीत नुकताच अशाच प्रकारच्या मेळाव्याचे आयोजित करण्यात आला होते , ज्यामध्ये पंतप्रधानांना भेट देण्याची संधी मिळाली .

नीम आवरण असलेल्या युरिया मुळे शेतक-यांना मदत झाली असून यामधील भ्रष्टाचार तसेच चोरी च्या प्रकरणांना पूर्णविराम मिळाला. आहे असेही मोदी यांनी सांगितले.

B.Gokhale