पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या हस्ते आय आय टी गांधीनगर परिसर राष्ट्राला समर्पित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आय आय टी गांधीनगर परिसर राष्ट्राला समर्पित केला.

प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानाअंतर्गत प्रशिक्षणार्थींचा पंतप्रधानांनी गौरव केला.

पंतप्रधानांनी गांधीनगर इथे जनसभेला संबोधित केले, यावेळी आयआयटीयन्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुम्ही आयआयटीयन्स आहात तर युवा काळात मी टी-यन्स म्हणजे चहा विकला. काही वर्षांपूर्वी या दिवशी मी मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली. तोपर्यंत मी कधी आमदारही नव्हतो. त्या वेळी मी निर्धार केला मी माझ्या पूर्ण शक्तीनिशी काम करेन.

देशात सर्वत्र, सर्व वयोगटाच्या आणि समाजाच्या सर्व स्तरात डिजिटल साक्षरतेचा प्रसार करण्याचे कार्य सुरु असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

डिजिटल इंडिया म्हणजे पारदर्शकता, प्रभावी सेवा आणि सुप्रशासनाची हमी.

आपला अभ्यासक्रम केवळ परीक्षाकेंद्री असता कामा नये तर कल्पकतेवरही लक्ष केंद्रित केलेले असावे असे पंतप्रधानांनी सुचवले.

***

S.Tupe./N.Chitale/Anagha