पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या हस्ते प्रधानमंत्री सौभाग्य योजनेचा शुभारंभ, दिनदयाळ ऊर्जा भवनचे केले लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे “प्रधानमंत्री सहज बिजली घर” अर्थात सौभाग्य योजनेचा शुभारंभ केला. सर्व घरांमध्ये वीज पोहोचवणे हे या योजनेचे लक्ष्य आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनी “दिनदयाळ ऊर्जा भवन” या ओएनजीसीच्या नवीन इमारतीचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते झाले.

“वसई वायू क्षेत्रातील बूस्टर कॉम्प्रेसर सुविधा ही पंतप्रधानांनी राष्ट्राला अर्पण केली.

गरीबातल्या गरीब व्यक्तीच्या कल्याणासाठी केंद्र सरकार ज्या पध्दतीने योजनांची अंमलबजावणी करत आहे ते अधोरेखित करण्यासाठी पंतप्रधानांनी “जन धन योजना, विविध विमा योजना, मुद्रा योजना उज्वला योजना आणि “उड्डाण” या योजनांच्या यशस्वीतेचा दाखला दिला.

याच संदर्भात बोलतांना पंतप्रधानांनी “प्रधानमंत्री सहज बिजली घर योजनेचा या योजनेंतर्गंत सध्या वीज जोडणी नसणाऱ्या अंदाजे 4 कोटी वीज जोडणी दिली जाईल. या योजनेचा खर्च 16 हजार कोटी रुपयांहून अधिक असून, या वीज जोडण्या मोफत दिल्या जातील, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

एक हजार दिवसात वीज नसलेल्या 18 हजार गावांचे विद्युतीकरण करण्याचे लक्ष्य कसे ठेवले होते, हे पंतप्रधानांनी यावेळी झालेल्‍या सादरीकरणाच्या वेळी स्पष्ट केले. आता 3 हजार गावांचे विद्युतीकरण शिल्लक असल्याचे ते म्हणाले.

कोळशाची कमतरता ही आता भूतकाळतली गोष्ट झाली असून, ऊर्जा निर्मितीतील अतिरिक्त क्षमतेचे लक्ष्य पार केले असल्याचे त्यांनी सांगितले. 2022 पर्यंत नवीकरणीय ऊर्जेसाठीचे 175 गीगावॅट लक्ष्य साध्य करतांना नवीकरणीय ऊर्जेच्या स्थापित क्षमतेत झालेल्या वाढीबद्दलही पंतप्रधानांनी सांगितले. नवीकरणीय ऊर्जेच्या दरात लक्षणीयरित्या घट झाल्याचे ते म्हणाले. पारेषण वाहिन्यांमध्येही मोठी वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.

“उदय” योजनेमुळे ऊर्जा वितरण कंपन्यांचा तोटा कसा कमी झाला आहे, याचा उल्लेखही पंतप्रधानांनी केला. ही योजना सहकार आणि स्पर्धात्मक संघराज्याचे उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.

“उज्वला” योजनेच्या अर्थकारणातील प्रभावाबद्दल बोलतांना, एलईडी बल्बच्या किंमती मोठया प्रमाणात कमी झाल्याचेही ते म्हणाले.

नवीन भारतात समानता, कार्यक्षमता आणि शाश्वती या मूलभूत तत्वांवर कार्य करणारी ऊर्जा चौकट आवश्यक आहे, असे पंतप्रधान म्हणाले. केंद्र सरकारच्या कार्य पध्दतीतील बदलामुळे ऊर्जा क्षेत्र मजबूत होत आहे. यामुळे सर्व देशातील कार्य पध्दतीवर सकारात्मक बदल होईल असे त्यांनी सांगितले.

B.Gokhale/J.Patanakar/Anagha