पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांना हिमाचल प्रदेशातील भूस्खलनात झालेल्या जीवित हानी बद्दल शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात भूस्खलनात झालेल्या जीवित हानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.

आपल्या संदेशात ते म्हणतात, ” हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात भूस्खलनात झालेल्या जीवित हानीबद्दल मला अत्यंत दुःख झाले असून या अपघातातील मृत्यू मुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो.”

” हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात जखम झालेल्यानी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. राष्ट्रीय नैसर्गिक आपदा प्रतिसाद दल अर्थात एन डी आर एफ घटना स्थळी पोहचला असून मदत कार्य चालू आहे तसेच सर्व शक्य आणि आवश्यक ती मदत केल्या जाईल असे पंतप्रधानांनी सांगितले.

पी.आई.बी/ बी. गोखले