पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी केले स्वछता श्रमदान; पशुधन आरोग्य मेळाव्याला भेट.आणि शाहंसहपूर, वाराणसी येथे उपस्थितांना संबोधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथील शाहंसहपूर खेड्यात शौचालय बांधण्यासाठी श्रमदान केले. त्यांनी पाणंद मुक्त गाव करण्याचा ज्या लोकांनी संकल्प केला आहे अशा, लोकांशी संवाद साधला. तसेच पंतप्रधानांनी शौचालय असलेल्या घरांना “इज्जत घर” नाव देण्याच्या निर्णयाचे ही कौतुक केले.

पंतप्रधानांनी गावात आयोजित केलेल्या पशुधन आरोग्य मेळाव्यास भेट दिली. त्यांना परिसरात लावण्यात आलेल्या विविध आरोग्य व वैद्यकीय उपक्रमांना माहिती दिली. यामध्ये गुरांची शस्त्रक्रिया, अल्ट्रासोनोग्राफी आदींचा समावेश आहे.

याप्रसंगी एका मोठ्या समारंभास संबोधित करताना, पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, योगी आदित्यनाथ आणि राज्य सरकार यांचे आरोग्य मेळा यशस्वीरीत्या आयोजित केल्याबद्दल अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. राज्यातील पशूसंवर्धन क्षेत्रास लाभ होईल यासाठी हा एक नवीन प्रयत्न असल्याचे सांगून पंतप्रधान पुढे म्हणाले की, दूध उत्पादकतेत वाढ केल्यास लोकांना आर्थिक लाभ होईल. देशाच्या इतर भागां मध्ये सहकारी संस्थानी केलेल्या मदतीमुळे डेअरी क्षेत्रातील नफा वाढविण्यास मदत होऊ शकते, असेही ते म्हणाले.

वर्ष 2022 पर्यंत, लोकांच्या कल्याणासाठी शेतीची कमाई दुप्पट करण्याची प्रतिज्ञा पंतप्रधानांनी केली. त्यांनी नमूद केले की, माती आरोग्य कार्ड्स शेतक-यांना काही प्रमाणात लाभान्वित आहेत. त्यांनी सांगितले की, स्वातंत्र्यसैनिकांच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी , आपल्यापैकी प्रत्येकाने सकारात्मक योगदान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

पंतप्रधानांनी म्हटले की ” स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे”, ही भावना सर्वांना सर्वांमध्ये रुजली पाहिजे. त्यांनी सांगितले की, यामुळे निरोगी, तसेच गरिबांच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या दिशेने आपण मार्गक्रमण करू शकू. त्यांनी म्हटले की, स्वच्छता हि एक प्रार्थना, आणि गरीबांची सेवा करण्याचा एक मार्ग आहे.

पी. आई. बी/ बी. गोखले