पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान हिमाचल प्रदेशच्या भेटीवर, बिलासपूर येथे “एम्स”चा शिलान्यास

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचल प्रदेशच्या भेटीवर आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते बिलासपूर येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा (एम्स) शिलान्यास आज करण्यात आला. 750 खाटांची सुविधा असणाऱ्या या रुग्णालाच्या उभारणीसाठी अंदाजे 1350 कोटी रुपये खर्च येणार आहे. आरोग्य सुविधेबरोबरच या “एम्स्‌”मध्ये पदवी आणि पदव्युत्तर स्तराचे वैद्यकीय शिक्षण देण्यात येणार आहे. तसेच परिचारिका शिक्षण देण्यात येणार आहे.

या दौऱ्यात पंतप्रधानांनी “उना” येथे भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थांचाही (आयआयआयटी) शिलान्यास केला. तसेच कांगडा जिल्हयातल्या कांडरोरी येथे पोलाद प्राधिकरणाच्या पोलाद प्रक्रिया विभागाचे उद्‌घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज झाले.

B.Gokhale/S.Bedekar/Anagha