पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बंगळुरु येथे दशमाह सौंदर्य लहरी पारायणोत्सव महासमर्पणाला पंतप्रधानांची उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बंगळुरु येथे दशमाह सौंदर्य लहरी पारायणोत्सव महासमर्पणाला उपस्थित राहिले.

सौंदर्य लहरी हा आदि शंकराचार्य यांनी रचलेल्या श्लोकांचा संच आहे. या कार्यक्रमात सौंदर्य लहरींचे सामूहिक पठन केले गेले.

यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, या सामूहिक पठणामुळे वातावरणात एका विशेष ऊर्जेची त्यांना अनुभूती येत आहे.

काही दिवसांपूर्वी केलेल्या केदारनाथ दौऱ्याची आठवण पंतप्रधानांनी सांगितली ते म्हणाले की, आदि शंकराचार्य यांनी त्यांच्या अल्पकालीन आयुष्यात दुर्गम भागांमध्ये तसेच भारतातील अन्य ठिकाणी जाऊन केलेले कार्य पाहून ते अचंबित झाले आहेत. आदि शंकराचार्य यांनी वेद आणि उपनिषदांच्या माध्यमातून भारताला एकजूट केल्याचे ते म्हणाले.

आदि शंकराचार्य यांच्या सौंदर्य लहरी या रचनेशी सामान्य माणूस स्वत:ला जोडू शकतो असे पंतप्रधान म्हणाले. आदि शंकराचार्य यांनी समाजातून दुष्प्रवृत्ती दूर केल्या आणि त्यांना भावी पिढीपर्यंत पोहोचण्यापासून रोखले. आदि शंकराचार्य यांनी विविध विचारसरणी आणि विचारांमधील सर्वोत्तम पध्दती आत्मसात केल्या. आदि शंकराचार्यांचे प्रायश्चित आजही भारतीय संस्कृतीच्या विद्यमान स्वरुपात अस्तित्वात आहे, जी सर्वांचा स्वीकार करते आणि सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाते असे ते म्हणाले. ही संस्कृती नवीन भारताचा पाया आहे आणि ती सबका साथ – सबका विकास मंत्राचे पालन करते असे पंतप्रधान म्हणाले.

एक प्रकारे भारताच्या सांस्कृतिक वारशामध्ये सर्व जागतिक समस्यांवर उपाय आहेत; असे पंतप्रधान म्हणाले. भारतात निसर्गाचे शोषण रोखण्यावर नेहमीच भर देण्यात आल्याचे ते म्हणाले.

ज्या एलईडी दिव्यांची किंमत 350 रुपयांहून अधिक होती, ते आता उजाला योजनेअंतर्गंत, केवळ 40 ते 45 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. आतापर्यंत 26 कोटींहून अधिक एलईडी दिवे वितरित करण्यात आल्याचे त्‍यांनी सांगितले. यामुळे विजेच्या बिलातही बचत झाल्याचे पंतप्रधान म्हणाले.

उज्वला योजनेअंतर्गंत, 3 कोटींहून अधिक एलपीजी जोडण्या देण्यात आल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. यामुळे केवळ ग्रामीण महिलांच्या आयुष्यातच सकारात्मक बदल झाला नाही तर पर्यावरण स्वच्छ ठेवण्यातही हातभार लागला असे ते म्हणाले. निरक्षरता, अज्ञान, कुपोषण, काळा पैसा आणि भ्रष्टाचार यांसारख्या दुष्प्रवृत्तींपासून भारताला मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

B.Gokhale/S.Kane/Anagha