पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

लाल किल्ल्याजवळील माधव दास पार्क येथे दसऱ्यानिमित्त आयोजित समारंभाला पंतप्रधान उपस्थित देशासाठी सकारात्मकपणे योगदान देण्याचा संकल्प करण्याचे जनतेला आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतील लाल किल्ल्याजवळच्या माधव दास पार्क येथे आयोजित दसरा सोहळ्याला उपस्थित राहिले.

आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले, 2022 साली देश जेव्हा स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने सकारात्मक योगदान देण्याचा संकल्प करायला हवा. पंतप्रधान म्हणाले, ‘भारतीय सण हे केवळ साजरे करण्यासाठी नाहीत, तर समाजाला शिक्षित करण्याचे माध्यम देखील आहे. हे सण आपल्याला समाजातील मूल्यांप्रति जागरुक करतात, तसेच एक समाज म्हणून एकत्र राहण्याची शिकवण देतात.’

हे सण आपल्या एकत्रित सामर्थ्याचे, सामाजिक-सांस्कृतिक मूल्यांचे आणि समृध्द सांस्कृतिक परंपरांचे प्रतिबिंब आहे. याशिवाय, ते शेती, नद्या, पर्वत, निसर्ग आदींशी जोडलेले आहेत. या कार्यक्रमादरम्यान रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या प्रतिमांच्या दहनप्रसंगी पंतप्रधान उपस्थित होते.

S.Tupe/N.Chitale/P.Kor