पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सेबी आणि जिब्राल्टर एफएससी यांच्या सांमजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सेबी म्हणजेच सेक्युरिटीज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आणि जिब्राल्टर वित्त सेवा आयोग यांच्या दरम्यान होत असलेल्या सामंजस्य कराराला मान्यता देण्यात आली. या उभय संस्था परस्परांना तांत्रिक सहकार्य करणार आहेत.

या सामंजस्य करारामुळे दोन्ही आर्थिक क्षेत्रातल्या नियामक संस्थांना माहिती आणि तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करता येणार आहे. दोन्ही देशांमधल्या रोखे बाजारांचा प्रभावी विकास करण्याच्या दृष्टीने हा करार उपयुक्त ठरणार आहे.

तसेच दोन्ही देशांना रोखे बाजारासंबंधी माहितीची देवाण-घेवाण करता येणार आहे. सेबी आणि एफएससी या दोन्ही संस्थांना आपल्या कार्यकक्षा देशाबाहेर विस्तारण्यासाठी या करारामुळे मदत होणार आहे.

N.Sapre/S.Bedekar/Anagha