पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांचे मनोबल उंचावणारी – पंतप्रधान

“प्रधानमंत्री पीक विमा योजना देशभरातल्या शेतकऱ्यांचे मनोबल उंचावणारी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

ट्विटरवरुन पंतप्रधानांनी आपले विचार जनतेसमोर मांडले आहेत.

“शेतकरी बंधु भगिनींनो तुम्ही सर्व लोहडी, पोंगल, बिहूसारखे वेगवेगळे सण साजरे करत असताना तुम्हाला सरकारकडून एक भेट – प्रधानमंत्री पीक विमा योजना”.

“प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये आतापर्यंतच्या सर्व योजनांची वैशिष्ट्ये आहेतच, शिवाय आधीच्या योजनांमध्ये ज्या त्रुटी होत्या त्या दूर करण्यात आल्या आहेत.

“आतापर्यंतचा विम्याचा सर्वात कमी हप्ता, मोबाइल फोनसारख्या सुलभ तंत्रज्ञानाचा वापर करुन नुकसानीचे मोजमाप, निर्धारित वेळेत दावे निकाली काढणार”.

“शेतकरी बंधुभगिनींनो आणखीही काही पैलूंवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होणे, लाभ घेणे सोपे आहे. तुम्ही यात जरुर सहभागी व्हा.”

“हा एक ऐतिहासिक दिवस आहे. शेतकरी कल्याणाने प्रेरित असलेली प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या जीवनात खूप मोठे परिवर्तन घडवेल, असा मला विश्वास आहे”.

“प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समाविष्ट संकटांचा परिघ अधिक व्यापक करण्यात आला आहे. पाणी भरणे, कापणीनंतर होणारे नुकसान यांचाही समावेश संकटांमध्ये करण्यात आला आहे”.

S.Kakde/S.Tupe/M.Desai