आज आपण केवळ भूमीचे जलसिंचन करणारे किंवा काही घरात प्रकाश पोचवणाऱ्या एक प्रकल्पाचे उद्घाटन करत नाही आहोत, तर आपण एका प्रदेशाचे पुनरुज्जीवन करतोय, आशा जागवतो आहे, आयुष्याला नवसंजीवनी देतो आहोत, अफगानिस्तानाच्या भविष्याला आकार देतो आहोत हे धोरण केवळ वीजनिर्मिती करणार नाही तर अफगानिस्तानच्या उज्ज्वल भविष्याविषयी विश्वास आणि आशा निर्माण करेल.