आधुनिक भारत त्याच्या 70 व्या वर्षात आहे. माझ्या सरकारसाठी संविधान हे खऱ्या अर्थाने पवित्र ग्रंथ आहे. आणि या पवित्र ग्रंथात निष्म, वाक आणि मत स्वातंत्र्य, समान नागरिकत्व, या सर्व गोष्टींना मूलभूत हक्कांचा दर्जा देण्यात आला आहे. माझे 800 दशलक्ष नागरिक दर पाच वर्षांनी मतदान अधिकाराचे स्वातंत्र्य अनुभवतात, परंतु सर्व सव्वाशे करोड नागरिक त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणात भयमुक्त स्वातंत्र्यांचा अनुभव घेतात.