आम्ही अनेक क्षेत्रात विनासायास मंजूरी मिळण्याची तरतूद केली आहे तसेच संरक्षण आणि रेल्वे क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. विमा कायद्यातल्या बहुप्रतीक्षित सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली त्यानंतर अमेरिकेसह अनेक जागतिक विमा कंपन्यानी भारतीय विमा क्षेत्रात गुंतवणूकवाढवली आहे. व्यवसाय सुलभता येण्यासाठी आम्ही अनेक उपाययोजना केल्या आहेत. या सगळ्यामुळे व्यासाय सुलभतेच्या क्षेत्रात आपण जागतिक क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.