जागतिक अर्थव्यवस्थेचे इंजिन म्हणून महत्वाची भूमिका बजावण्यास भारत सज्ज झाला आहे. भारतासारख्या मोठ्या आणि बहुपेडी अर्थव्यवस्थेचे जगाला अनेक लाभ मिळू शकतात भारत ही एक मोठी बाजारपेठ आहेच , मात्र त्याहीपेक्षा अधिक म्हणजे , भारत एक विश्वासार्ह भागीदार आहे. अतिशय उच्च गुणवत्तेचे शास्त्रीय, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापकीय कौशल्य असणारा देश आहे.