जेव्हा जेव्हा आपल्याला “विकलांग” व्यक्ती भेटते तेव्हा आपले लक्ष त्यांच्या व्यंगाकडे जाते मात्र त्यांच्यातल्या अफाट क्षमता आणि सामर्थ्य आपल्याला दिसत नाही आणि म्हणूनच मी तुम्हा सर्वांना विकलांगच्या ऐवजी दिव्यांग हा शब्द वापरण्याचे आव्हान करतो. - गुजरातमधील नवसारी येथे सामाजिक अधिकारीता शिबिरात पंतप्रधान मोदी बोलत होते.