दक्षिण आशियामध्ये तसेच भारत आणि या प्रातांतील बहुतांश देश आर्थिक समृध्दीच्या दिशेने शांततापूर्ण मार्गाचा अवलंब करत आहे. मात्र भारताच्या शेजारी असा एक देश आहे ज्याचा स्पर्धात्मक लाभ केवळ दहशतवाद निर्माण करणे आणि पोसणे यामध्येच आहे यामुळे शांतता कमी होत असून हिंसाचार वाढत आहे. त्यामुळे शांतता आणि समृध्दीला धोका निर्माण होत आहे. आज जागतिक दहशतवादाचा पुरस्कार थांबवण्याची वेळ आली आहे. या चिथावणीवर निर्बंध घालण्याची वेळ आली आहे – 11व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी