देशातील लाखो कुटुंब विदयुत जोडणीपासून वंचित आहेत. जोपर्यंत देशाच्या शेवटच्या घरापर्यंत वीज जोडणी पोहचत नाही तोपर्यंत विकासाची फळे सामान्य माणसांपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात, उर्जाक्षेत्रातील उत्पादन व जोडणीमध्ये मोठी झेप घेतल्याखेरीज आपल्याजवळ कोणताच पर्याय उरत नाही.