पूर्वीच्या सरकारमध्ये एक प्रकारे नकारात्मक वातावरण होते आणि आणि त्याचा परिसंस्थेवरील परिणामही खूप अधिक होता देशातले व्यापारी उद्योजक सर्व बाहेर जाण्याच्या विचारात होते सरकारमध्ये एकप्रकारे लकवा आल्यासारखी स्थिती होती जेव्हा आम्ही सत्तेवर आलो आम्हाला लागोपाठ दोन वर्ष दुष्काळाचा सामना करावा लागला, पाणी टंचाई होती, जगभरात मंदीचे वातावरण निर्माण झाले होते अशाप्रकारे आल्यानंतर एकापाठोपाठ एक आव्हाने येत गेली. मात्र आमचे विचार पक्के होते धोरणे स्पष्ट होती, मन स्वच्छ होते, निर्णय घेण्याचा उत्साह होता, कारण यामुळे हानी होणार नव्हती याचा परिणाम असा झाला की सकारात्मक वातावरण जलद गतीने वाढायला लागले – नेटवर्क 18 ला पंतप्रधान मोदींनी दिलेली मुलाखत