भारत-अमेरीकेदरम्यानच्या नात्यातील महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, अमेरिकन अर्थव्यवस्थेचा भाग असलेल्या भारतीय आणि अमेरिकन लोकांची भूमिका. एका देशातील स्थलांतरीत जेव्हा दुसऱ्या देशात रहिवासी बनतात तेव्हा त्याना दोन्हीकडे मिळणारा मानसन्मान दुर्मिळ असतो. अमेरिकन भारतीय हे उभय देशांमधले संबंध अधिक दृढ करणारा दुवा आहेत.