भारत प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे आणि मी अमेरिकेकडे एक अपरिहार्य भागीदार म्हणून पाहत आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असेल की, कणखर आणि समृद्ध भारतामध्ये अमेरिकेला धोरणात्मक रुची आहे. भागीदारी मूल्यांच्या व्यवहारी सहकार्यात परिवर्तन करण्यासाठी एकत्रित काम करुया. यात काहीच शंका नाही की, हे संबंध पुढे नेण्यामध्ये दोन्ही देशांचा फायदा आहे.