भारत ही क्षमतावान भूमी आहे आणि आता ही सक्षम धोरणात्मक वातावरणाचीही भूमी बनली आहे. 1.25 अब्ज कोटीचे हे राष्ट्र असून 800 दशलक्ष युवकांच्या रूपात असामान्य संसाधनाचा आशीर्वाद या देशाला मिळालेला आहे. ज्याप्रसंगी जागतिक अर्थव्यवस्था कमकुवत होते, त्यावेळी सर्व जग एकाच आवाजात म्हणते की, भारत आपले क्षेत्र आणि जगासाठी नवा आशेचा किरण आहे.