माझी कार्य यादी मोठी आणि महत्त्वाकांक्षी आहे. यामध्ये चैतन्यपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेसह, संपन्न कृषी क्षेत्र, प्रत्येकाच्या डोक्यावर छत, प्रत्येक घरात वीज, करोडो युवकांना कौशल्य प्रदान करणे, 100 स्मार्ट सिटी उभारणे, गावांना डिजिटल भारताशी जोडणे, 21 व्या शतकाची रेल्वे, रस्ते आणि पायाभूत बंदरे बांधणे या सर्व गोष्टींचा समावेश आहे. या केवळ आकांक्षा नाहीत, ही उद्दिष्ट आहेत जी निश्चित कालावधीत पूर्ण करायची आहेत.