माझ्यासाठी तंत्रज्ञान हे शोधण्‍याचे शिकण्‍याचे, विकसित करण्‍याचे व कार्यान्वित करण्‍याचे साधन आहे. यामध्‍ये 3 एस चा – म्‍हणजे स्‍पीड अर्थात (वेग) सिम्लिसीटी अर्थात (सहजता) आणि सर्व्हिस अर्थात (सेवा) चा समावेश होतो. तंत्रज्ञान हे जलद आहे तंत्रज्ञान सोपे आहे आणि तंत्रज्ञान लोकांना सेवा प्रदान करण्‍याचे प्रभावी माध्‍यमच आहे. हे एक चांगले गुरु सुद्धा आहे. जितके जास्‍त आपण तंत्रज्ञानाविषयी शिकतो आणि तंत्रज्ञानाद्वारे जास्‍त शिकतो तितकेच अधिक चांगले असते.