वर्षभरापूर्वी मानवजातीच्या इतिहासातील सर्वात मोठया लोकशाही निवडणुकीत सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या एका देशाने बदलासाठी आणि प्रगतीसाठी मतदान केले. भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विविधतेच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठया आव्हानांचा सामना करावा लागेल याची आम्हाला जाणीव आहे आणि देशाच्या एकजुटीतून आम्हाला विश्वास मिळतो. 35 वर्षांखालील 80 कोटी युवकांच्या इच्छा-आकांक्षामधून आम्हाला ऊर्जा मिळते.