वाढत्या पारंपारिक आणि अपारंपारिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर राजकीय-सुरक्षा सहकार्य हे आपल्या संबंधाचे प्रमुख स्तंभ म्हणून उदयाला येत आहे. सीमेपलिकडून होणारा दहशतवाद, वाढता मूलतत्ववाद, विरोध आणि हिंसाचाराचा प्रसार हे आपल्या समाजासमोरील समान सुरक्षाविषयक धोके आहेत. हा धोका स्थानिक, प्रांतीय आणि आंतरराष्ट्रीय देखील आहे. आसियान बरोबरची आमची भागिदारी बहुस्तरावर समन्वय सहकार्य आणि अनुभवाचे आदान-प्रदान यावर आधारित प्रतिसाद तयार करत आहे - 14व्या आसियान-भारत शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी