वीज, पाणी आणि रस्ते ...पूर्वी या तीन गोष्टीच गरीबांसाठी मुलभूत गरजा मानल्या जायच्या मात्र आम्ही त्यात शिक्षण आणि आरोग्य यांचा समावेश केला आहे. या पाच घटकांना चालना देऊन आम्ही केवळ रोजगारांच्या संधीच निर्माण करत नाही तर त्यांचे भविष्यही सुरक्षित करत आहोत.आणि म्हणूनच “सबका साथ सबका विकास” हा मंत्र देशभरात निनादत आहे - गुजरातमधील लिमखेडा येथे पंतप्रधान बोलत होते.