स्टार्ट-अप नवविकासाचे इंजिन आहे जे नवीनतेची शक्ती दाखवते. अनेक मोठया कंपन्या ज्या आज आहेत, त्या काल स्टार्ट-अपच होत्या. कठोर परिश्रम आणि सक्षमता याच्या बळावर उद्योजकता आणि साहसातून त्यांची सुरुवात झाली आणि आज त्या नवीनतेच्या प्रतीक बनल्या आहेत.