अँटोनियो कोस्टा, अध्यक्ष, युरोपियन कौन्सिल
आम्ही आमच्या संबंधांमध्ये एक नवीन अध्याय उघडत आहोत – व्यापार, सुरक्षा आणि लोकांमधील संबंधांच्या बाबतीत. मी युरोपियन कौन्सिलचा अध्यक्ष आहे पण मी एक भारतीय विदेशी नागरिक देखील आहे. त्यामुळे, आपण कल्पना करू शकता त्याप्रमाणे, माझ्यासाठी याचा एक विशेष अर्थ आहे. गोव्यातील माझ्या मुळांचा मला खूप अभिमान आहे, जिथून माझ्या वडिलांचे कुटुंब आले होते. युरोप आणि भारत यांच्यातील संबंध ही माझ्यासाठी एक वैयक्तिक बाब आहे.