अनंत गोयंका, वरिष्ठ उपाध्यक्ष, फिक्की
भारत-यूके मुक्त व्यापार करार हा दोन्ही देशांच्या भागीदारीतील ऐतिहासिक क्षण आहे. हा करार व्यवसायांसाठी खूप महत्त्वाचा असून भारतीय निर्यातदारांना अधिक निश्चितपणे सुधारित बाजारपेठेत प्रवेश करता येईल. भारतीय व्यवसायांना लक्षणीय संधींच्यादृष्टीने आश्वासक असलेल्या आणि द्विपक्षीय व्यापार तसेच आर्थिक सहकार्याची पायाभरणी करणाऱ्या या सर्वंकष कराराचे FICCI स्वागत करते.