अमित शहा, भाजपाध्यक्ष
लोकांसाठी काम करण्याची आणि देवाने दिलेली जनसेवेची संधी गाठण्याची पंतप्रधान मोदींची सवय आहे. एखाद्या शहराचा विकास असो अथवा गावाचा त्यात फरक असता कामा नये आणि पंतप्रधान मोदींनी ते सिद्ध केले आहे. पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असेपर्यंत राज्याचा विकास दर 12 टक्के होता. त्यांना जे प्रचंड बहुमत मिळाले आहे ते गेली 12 वर्षे ते करत असलेल्या कठोर परिश्रमांचा परिपाक आहे. पंतप्रधान मोदी तसेच आहेत जसे ते गुजरातचे मुख्यमंत्री असतांना होते. त्यांचे व्यक्तिमत्व आणि नेतृत्वगुणांमुळे सर्वांचे लक्ष त्यांच्यावर असते.