बँक खात्यांमध्ये ठेवींचे प्रमाण वाढल्याने आर्थिक साहाय्याचे प्रमाण वाढले आहे. याचा अर्थ असा आहे की, जे भांडवल पूर्वी खाजगी पद्धतीने गुंतवले जात होते ते आता अर्थपुरवठा करणा-या संस्थांच्या माध्यमातून गुंतवले जाईल. याचा चांगला परिणाम(अर्थव्यवस्थेवर) दिसून येईल. आपण डिजिटाइज्ड व्यवहारांच्या दिशेने वळल्यामुळे आपल्या व्यवहारांची क्षमता वाढेल. ही एक सकारात्मक बाब देखील असेल.