अरुंधती भट्टाचार्य, अध्यक्ष, SBI
जीएसटी एक मोठी सुधारणा आहे. जसं माननीय पंतप्रधानांनी म्हटले आहे, ही केवळ आर्थिक सुधारणा नसून ती एक सामाजिक सुधारणा आहे आणि आम्ही बघत आहोत की याबद्दल खूप उत्सुकता आहे; ही देशातली खूप परिणामकारक सुधारणा आहे. आमचा असा विश्वास आहे की कराचे दर कमी होऊन यंत्रणेत उत्तम उत्पादकता आणि कार्यक्षमता आणण्याच्या दृष्टीने याचा परिणाम दीर्घ कालावधीत नव्हे तर मध्यम कालावधीतच  होईल.