“त्या काळातील एक लोकप्रिय कार्यक्रम “बिग फाइट”च्या एका भागाचे निवेदन करण्याची मोठी संधी मला मिळाली होती. विषय होता काश्मीरचा. मी मोदी यांना विचारले की ते या कार्यक्रमात सहभागी होतील का? काश्मीरवरील त्या भागात इतर सहभागी होते, हुर्रियतचे मीरवाझ उमर फारूक, अनुभवी मुत्सद्दी जी. पार्थसारथी आणि नरेंद्र मोदीजी हे अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या दृष्टीकोनाचे प्रतिनिधीत्व करत होते. मोदींनी हुरियतच्या दृष्टीकोनाला त्यावेळी जे आव्हान केले ते अतिशय उल्लेखनीय होते. त्या भागाबद्दल मला लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. नुकतेच मी आणि पार्थसारथी यांनी मुंबई ते दिल्ली असा एकत्र विमान प्रवास केला त्यावेळी आम्ही राष्ट्रीय सुरक्षाविषयक मुद्यांबद्दल मोदींच्या मतांविषयी बोलताना आम्हाला त्या भागाची पुन्हा एकदा आठवण झाली.”