आज, भारत जागतिक प्रगतीमध्ये आघाडीवर असून या प्रगतीला विकास, शाश्वतता आणि तांत्रिक नवोन्मेषासाठीची धाडसी आणि सर्वसमावेशक दृष्टीचे मार्गदर्शन आहे. तुमच्या (पंतप्रधान मोदींच्या) गतिशील नेतृत्वाखाली, भारत ग्लोबल साउथचा एक खंदा समर्थक आणि आंतरराष्ट्रीय मंचावर एक शक्तिशाली आवाज म्हणून पुढे आला आहे. 2023 च्या G20 शिखर परिषदेचे तुम्ही केलेले यशस्वी आयोजन, तसेच पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावरील आगामी जागतिक शिखर परिषद ही या जागतिक नेतृत्वाची चमकदार उदाहरणे आहेत.