आनंद महिंद्रा, अध्यक्ष, महिंद्रा समूह
“आपल्या जीडीपीमधील वाढ जगाला हेवा वाटावी अशी आहे आपल्या भविष्यावर विश्वास असल्यामुळे आपण गुंतवणुकीसाठी जगातील पसंतीचे ठिकाण आहोत. परंतु या वाढीबरोबरच आता रोजगार निर्मितीत मोठी वाढ होईल हे सुनिश्चित करणे हे आपल्यासमोरचे अत्यावश्यक काम आहे. त्यामुळे माझ्या मते कालच्या अर्थसंकल्पातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे हे सरकारने आपले सर्वात महत्त्वाचे मिशन कोणते आहे हे ओळखले असल्याचा ठळक पुरावा आहे. आणि तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी ते कौशल्य रोजगाराइतकेच महत्त्वाचे आहे."