" दिवसातले १८ तास काम करत असताना मोदी जेव्हा कुणाला वेळ देतात, तो अमूल्य वेळ असतो, आणि तुम्ही सांगत असलेला प्रत्येक शब्द ते ऐकतात. काही व्यस्त लोक जसे मोबाईलकडे अधूनमधून पाहत असतात किंवा हाताळत असतात, तसे ते करत नाहीत. जर त्यांनी तुम्हाला पाच मिनिटांचा वेळ दिला असेल तर या पाच मिनिटांतील प्रत्येक सेकंद तुमच्याबाबत असतो, त्यांचा नसतो."