इआन ब्रेमेर, अध्यक्ष युरेशिया ग्रुप
तुम्हाला असे पंतप्रधान लाभले आहेत जे प्रचंड लोकप्रिय आहेत. भ्रष्टाचारमुक्त आणि सक्षम असल्यामुळे ते लोकप्रिय आहेत. अब्जावधी लोकसंख्या असलेल्या तुमच्या देशात अखेर तुम्हाला असा नेता मिळाला जो पैसे घेत नाही आणि आपले आजूबाजूचे लोकही घेणार नाहीत याची खबरदारी घेतो. त्यांची ध्येयधोरणे देशाच्या संपत्तीचा साधनसामग्रीचा उपयोग गरिबांच्या कल्याणासाठी कसा करता येईल याप्रती समर्पित असतात. त्यामुळे त्यांच्याकडे उत्तम राजकीय भांडवल जमा झाले असून त्याचा उपयोग ते पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी, भारतीय यंत्रणेमध्ये जीएसटीसारख्या प्रगतीपथावर नेणाऱ्या सुधारणांसाठी करतात.