उर्सुला वॉन डर लेयन, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा
आम्ही ते साध्य केले आहे. आम्ही सर्व सौद्यांची जननी असलेला ऐतिहासिक करार केला आहे. आम्ही 2 अब्ज लोकांची बाजारपेठ निर्माण करत आहोत. ही दोन महासत्तांची कथा आहे – जगातील दुसरी आणि चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था. भागीदारी निवडणाऱ्या दोन महासत्ता, खऱ्या अर्थाने दोन्ही बाजूंचा विजय (win-win) व्हावा अशा पद्धतीने. जागतिक आव्हानांवर सहकार्य हेच सर्वोत्तम उत्तर आहे, असा हा एक खंबीर संदेश आहे.