एपीएम टर्मिनल्सचे सीईओ कीथ स्वेन्सन
"माननीय पंतप्रधान, आणि जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा 'व्हायब्रंट गुजरात' दरम्यान भेटलो, तेव्हा मला ज्या एका गोष्टीने खूप प्रभावित केले, ती म्हणजे बंदर क्षेत्राबद्दलचे त्यांचे सविस्तर ज्ञान आणि आर्थिक प्रगतीला गती देण्यासाठी वाहतूक क्षेत्रांचे असलेले महत्त्व. तसेच, गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच्या काळापासून त्यांना बंदर क्षेत्राबद्दल अतिशय विशिष्ट आणि सखोल ज्ञान होते."