कृषी आयोगाच्या अनेक शिफारशींची अंमलबजावणी मोदी सरकारने केली आहे. यात सुधारित बियाणे, मृदा आरोग्य कार्ड पुरवणे यांचा समावेश आहे. सुधारित विमा, सिंचित क्षेत्रात वाढ आणि कृषी मंत्रालयाच्या जबाबदारीत शेतकरी कल्याणाची भर या कृषी आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात आली आहे. कृषी कामात ग्रामीण महिलांचे योगदान 50 टक्के आहे. कृषी विद्यापीठे आणि खासगी क्षेत्राच्या माध्यमातून त्यांची बाजारविषयक कौशल्ये वृद्धिंगत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.