मला असे वाटते की यावेळी पंतप्रधान मोदींसारखा नेता मिळणे हे देशाचे मोठे भाग्य आहे. ते आता पंतप्रधान आहेत आणि मी त्यांच्या मंत्रिमंडळाचा सदस्य आहे म्हणून केवळ मी असे म्हणतोय असे नाही. मी हे म्हणतोय कारण जेव्हा तुमच्याकडे शतकात एखाद्याच वेळी येणारे आरोग्यविषयक आव्हान उभे ठाकलेले असते, तेव्हा हे आरोग्याचे आव्हान आहे, पण आपल्या गावी जाणाऱ्या लोकांचे काय होईल; त्यांच्या खाण्यापिण्याची तुम्ही कशी व्यवस्था कराल; तुम्ही त्यांच्या खात्यात पैसे कसे टाकाल असा विचार फक्त जमिनीवर पाय असलेला माणूसच करू शकतो. स्त्रिया पैशाचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करतील अशी कल्पना सुचणारे फार लोक नसतात.