“देशाच्या क्षमतांचा पुरेपूर वापर करणाऱ्या नेत्याची आपल्या लोकशाहीला गरज होती आणि नरेंद्र मोदी हे तसे कणखर नेते आहेत. त्यांच्या मते मानवी संस्कृतीच्या इतिहासात ज्या देशाने असाधारण भूमिका पार पाडली, ज्याच्याकडे अफाट बौद्धिक सामर्थ्य आहे आणि आर्थिकदृष्ट्या जो प्रगती करत आहे त्या देशाला जगात त्याचे योग्य स्थान मिळायला हवे. आंतराष्ट्रीय स्तरावर ते ज्या आत्मविश्वासाने सामोरे जातात तसा आत्मविश्वास कित्येक दशके पाहायला मिळाला नव्हता. प्रमुख जागतिक नेत्यांशी दृढ संबंध निर्माण करण्याची त्यांची क्षमता त्यांचे राजनैतिक कौशल्य दाखवते.”