पंतप्रधान मोदी, आपण भारताचा कारभार अधिक चांगला करणारी आणि तुमच्या देशाला प्रमुख आणि प्रबळ जागतिक सत्ता म्हणून स्थान मिळवून देणारी परिवर्तनवादी शक्ती आहात. तुमच्या दूरदर्शी आणि भविष्यवेधी उपक्रमांद्वारे तुम्ही भारतीय अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण केले आहे. तुम्ही एक अब्जाहून अधिक नागरिकांना सशक्त केले आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जगभरातील सर्व भारतीयांच्या मनात अभिमानाची भावना निर्माण केली आहेत.