तुमच्या (पीएम मोदी) नेतृत्वाखाली भारताने जगाला मदतीचा हात दिला आहे. तुम्ही सहृदयतेने आणि सदिच्छेने राबविलेला लस उपक्रम हे परोपकारीपणाचे अजोड उदाहरण आहे. चार वर्षांपूर्वी, सारे जग कोविड-19 च्या महासाथीच्या संकटाला तोंड देत असताना, इतर काही देश वैद्यकीय साहित्याची साठेबाजी करण्याच्या मागे होते. तेव्हा तुम्ही, त्रिनिदाद आणि टोबॅगोसह इतर अगदी लहान देशांनाही लस आणि इतर आवश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध होईल याची काळजी घेतली. तुमच्या उदारतेमुळे भयाचे वातावरण जाऊन आशा आणि शांतता आली. मी पुन्हा म्हणते, ती गोष्ट मुत्सद्देगिरीच्या पलीकडची होती.ती नाती जपणारी कृती होती. ते सामायिक मानवतेचे कृत्य होते.