कीथ स्वेन्डसेन, एपी मोलर-मार्स्कचे सीईओ
व्हायब्रंट गुजरातमध्ये हजेरी लावणे खरोखर चांगली गोष्ट आहे. देशासाठीचे त्यांचे 2047 चे व्हिजन आणि ते सागरी क्षेत्राला कसे योग्य प्रकारे लागू होते याबद्दल पंतप्रधानांशी बोलण्याची संधी मिळणे हा मोठा बहुमान आहे. पंतप्रधानांसोबत चर्चा करण्याची संधी मिळणे खूप आनंददायी आहे, मला हे सांगायलाच हवे की धोरणे खूप प्रेरणादायी आहेत आणि आमच्या उद्योगाच्या तपशीलांबद्दल त्यांना असलेली माहिती पाहून मी खूप प्रभावित झालो.