कुमार मंगलम बिर्ला, आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष
“अल्पकालीन विचाराच्या पलीकडे जाऊन आर्थिक धोरणाचा दीर्घकालीन विचार करण्याची क्षमता हे मोदी सरकारचे वैशिष्ट्य आहे. सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने भांडवली खर्चात वाढ केली आहे, ज्यामुळे वाढ आणि गुंतवणुकीवर गुणक परिणाम झाला आहे. 2024 चा अर्थसंकल्प त्या वचनबद्धतेवर खरा उतरला आहे, भांडवली खर्चासाठीची तरतूद 11 ट्रिलियन रुपयांहून अधिक किंवा GDP च्या 3.4% इतकी आहे.”